हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
ऐतिहासिक पालखी मार्ग रस्त्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केली असून आमदार व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्यातून हा पालखी मार्गाचा रस्ता लवकरच पूर्ण करण्यातील त्यामुळे
येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे, हडपसरची वाहतूककोंडी टाळण्यासाठी रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 26 मधील ऐतिहासिक पालखी मार्ग रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते हा एक सक्षम पर्यायी रस्ता असून नगरसेवक नाना भानगिरे यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी व कलवट साठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केली त्यामुळे या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे या रस्त्यासाठी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक संजय घुले व आनंद अलकुंटे यांचेही सहकार्य लाभल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.
वनखात्याच्या जमिनी बाबत पाठपुरावा सुरू असून आगामी काळात रिंग रोड होणार आहे, रोड पुण्याला जोडला जाईल त्यामुळे हडपसर वर होणारा वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल या प्रभागातील व परिसरातील नागरिकांना सुरक्षित वाहतूक करता येईल अशी माहिती नगरसेवक भानगिरे यांनी दिली.
पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर व उपनगर मोठ्या प्रमाणात वाढत असून येथील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे नगरसेवकांनी पुढाकार घेऊन पर्यायी रस्ते व रिंगरोड साठी पाठपुरावा केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
Ι reɑlly likе it whenever people come together
and shаre views. Great blog, continue tһe good wοrk! https://thrashlist.com/
However, we are trying to emphasize that this great city is a beacon of enjoyment and activities.
Visualizar o conteúdo da área de trabalho e o histórico do navegador do computador de outra pessoa é mais fácil do que nunca, basta instalar o software keylogger.