दिल्ली (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, वकील, अभियंते,शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ या संघटनेने मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदी यांनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आम्ही चौकीदार होणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’नं या इंग्रजी दैनिकानं हे वृत्त दिलं आहे.
‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’नं (एआयबीओसी) पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. त्यात बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक प्रश्नांचा समावेश आहे. या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे. एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी संघटनेचे सदस्य आहेत. ‘सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमच्या समस्या सोडवण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. आमच्या समस्या सुटल्याशिवाय ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय प्रचारमोहिमेत आम्ही सहभागी होणार नाही असे त्यांनी कळवले आहे.
This post is priceless. Where can I find out more?
Dear immortals, I need some wow gold inspiration to create.
Lorsque vous prenez des photos avec un téléphone mobile ou une tablette, vous devez activer la fonction de service de positionnement GPS de l’appareil, sinon le téléphone mobile ne peut pas être positionné.