महाराष्ट्र

मांसाहार शौकिनांना सरकारचा झटका चिकन अंडी नव्या नियमाने होणार महाग कधी होणार अंमलबजावणी पहा बातमी

मुंबई : रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन – चिकन ,अंडी तुमच्या जेवणात नेहमी समाविष्ट असणारा पदार्थ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रोजच्या जेवणात तुम्ही चिकन, अंडी यांचा समावेश करीत असाल तर आता तुमचा खर्च वाढणार आहे. कारण सरकार कुक्कुटपालनासाठी नवा नियम लागू करणार आहे. कुक्कुटपालन व्यवसाय हा पशु क्रूरता अधिनियमाखाली येणार आहे.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार कुक्कुटपालन पशू क्रूरता अधिनियमाखाली आणण्याकरिता सरकारने नियम ड्राफ्ट केले आहेत. याशिवाय स्टेकहोल्डर्सना याबद्दल आपली मत, शिफारसी, सूचना द्यायला सांगितल्या आहेत. किमान यावर्षी तरी याचा परिणाम होणार नाही कारण सरकारद्वारे हा नियम १ जानेवारी २०२० मध्ये लागू करण्यात येणार आहे. या नियमाअंतर्गत सर्व कुक्कुटपालन करणाऱ्यांना नोंदी करणे आवश्यक असणार आहे. सरकारचा हा नियम तोडला तर दंड देखील द्यावा लागणार आहे.

पोल्ट्री फार्मची करावी लागणार नोंदणी

–या नियमांप्रमाणे रजिस्ट्रेशनच्या वेळी पूर्ण माहिती द्यावी लागेल.
–दर वेळी सरकार फार्मचं निरीक्षण करेल.
–त्यानंतर ६ ते ८ कोंबड्यांसाठी ५५० चौरस सेंटिमीटर जागा ठेवायला हवी.
–कोंबड्यांसाठी डाॅक्टर नियुक्त करावे लागतील.
–अँटिबायोटिक्स डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार द्याव्या लागतील. याचं रेकाॅर्डही ठेवावे लागणार आहे.

एकूणच काय हे नियम पाळल्यामुळे अंडी, चिकन महाग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भारत अंडी उत्पादनात जगभरात दुसऱ्या नंबरवर आहे. दर वर्षी भारतात ८८० कोटी अंड्यांचं उत्पादन होतं. तर ४२ लाख टन बाॅयलर कोंबड्यांच्या मांसाचं उत्पादन होतं.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

1 year ago

Nice post. I learn something totally new and challenging on websites

1 year ago

I read this paragraph completely concerning the comparison of latest and preceding technologies, it’s awesome article.

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x