हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
प्रभाग क्र २६ मध्ये सतत अपुऱ्या,ड्रेनेज मिश्रीत दूषित, अनियमित पाणीपुरवठा काळेपडल,चिंतामणी नगर,हंडेवाडी रोड,पांगरे मळा,बडदे मळा,दुगड चाळ आणि विविध सोसायट्यांमध्ये होत आहे,याकडे लष्कर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नगरसेवक नाना
भानगिरे यांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहे.या संदर्भात पुणे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीच उपाययोजना न केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी टोकाची भूमिका घेत शिवसेना स्टाइलने तिव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हादरलेल्या लष्कर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सरळ हडपसर पोलीस स्टेशनला पळ काढला. यावेळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्यासमोर ‘ जनतेसाठी मी जेलमध्ये जाईल पण तुम्हाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा या निष्क्रिय अधिकाऱ्यांना नाना भानगिरे यांनी दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी मध्यस्ती करून नगरसेवक भानगिरे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण एवढ्यावरच नाना भानगिरे हे थांबले नाहीत,त्यांनी या सुस्त अधिकाऱ्यांकडून पाणी पुरवठा सुरळीत करणार हे लेखी लिहून पाहिजे असे प्रशासनास ठणकावले १५ दिवसात पाणी प्रभाग क्र २६ मध्ये सुरळीत पाणी पुरवठा होईल ,तोपर्यंत मंगळवारपासून जास्त प्रमाणात टँकर पुरवले जातील,असे लेखी पत्र अधिकाऱ्यांनी दिले .या वेळी नाना भानगिरे यांनी मी स्वखर्चाने मोफत टँकर तर देतच आहेच,पण पाणी पुरवठा विभागाकडे निधी पुरेसा उपलब्ध नसेल तर तस सांगा मी निधी देतो पण जनसामान्यांचे पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात हाल झाले नाही पाहिजे, यावर उपाय योजना करू पण नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू पण याबाबत जर यापुढे अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही केली नाही तर मी टोकाची भूमिका घेणार आणि जबाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवणार असेही यावेळी नाना भानगिरे यांनी बजावले,यावेळी शिवसैनिक व नागरिक भानगिरे यांच्या समवेत उपस्थित होते.