मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
बरे झाले जयदत्त क्षीरसागरांनी पक्ष बदलण्यासाठी आजचाच मुहूर्त निवडला, कारण उद्याच्या निकालामध्ये बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी लीड मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोणत्याच पक्षाने प्रवेश दिला नसता म्हणूनच त्यांनी आजच पक्षप्रवेश उरकून घेतला असावा असा चिमटा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांनी आज आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेत प्रवेश केला त्यावर प्रतिक्रिया देतांना त्यांच्या या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटत नाही , कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपा उमेदवाराचा प्रचार केला होता असे मुंडे म्हणाले.