मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट,दोन राज्यमंत्रीपदासह लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे सूत्रांकडून समजते.आज होणा-या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, मोदींच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यानी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. कीर्तिकर यांच्यासह , संजय राऊत, प्रतापराव जाधव, भावना गवळी, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत.