पुणे : – (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स रस्त्यावर अनधिकृत चहाचा व्यवसाय करणाऱ्यांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी चहा विक्रेत्या दोन महिलांनी पुणे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोध करत स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाची धमकी दिली. तसेच अधिकाऱ्यांना अपशब्द वापरत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चहा विक्रेत्या दोन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या महिलांना पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे, या महिला पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
लता हाके आणि लक्ष्मी हाके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे असून पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली आहे. अतिक्रमण विभागाकडून लक्ष्मी लॉन्स रस्ता, कुमार पॅराडाईज जवळ, मगरपट्टा येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत पथारी लावलेल्या लोकांवर कारवाई करण्यात येत होती.या ठिकाणी आरोपी महिला चहाचा व्यवसाय करत होत्या. कारवाईवेळी त्या महिलांनी विरोध केला. तसेच खुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस शिपाई कोंढाळकर यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. तसेच खुडे यांच्या गाडी समोर येत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
महिलांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हिडिओ मध्ये पोलीस महिलांनी या गरीब चहा विक्रेत्या महिलांना मारहान केल्याचे दिसून येत आहे पोलीस महिलांच्याया कृत्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
Post Views:
33