हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन )
साधना विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.अभंग ए.डी.होते.कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पुजनानी झाली.आषाढशुध्द पौर्णिमा गुरूपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धायतोंडे टी.बी. यांनी केले. विदयार्थी मनोगतात ओंकार शिंदे याने’गुरूने दिला वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा’हे सुंदर गीत गाऊन सर्वांची मने जिंकली. अथर्व रासकर याने गुरुविषयी माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतात अभंग सरांनी सांगितले पहिले गुरू आई वडील होत. त्यानंतर आपल्याला ज्ञान देणारे आपल्या पायावर उभे करणारे गुरू होय. सर्वात महत्त्वाचे गुरू म्हणजे आपले मित्र जे नेहमी अडचणीच्या काळात आपल्याला नेहमीच मदत करत असतात.प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपणास ज्ञान देणारे अनेक घटक आपल्याला मदत करतात. कोणत्याना कोणत्या स्वरुपाचे ज्ञान देतात. अशा सर्वांचे ऋण व्यक्त करुन सर्व गुरुनानक माझे कोटी कोटी प्रणाम .
शिक्षक मनोगतात श्रीमती.मोटे पी.पी.यांनी माहिती दिली.कार्यक्रमामध्ये उपमुख्याध्यापक श्री.कुलकरणी एस.बी., पर्यवेक्षक श्री.मोहीते एस.आर. सर्व शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.साळुखे ताई यांनी केले. आभार सौ.ढोणे जय.एम.यांनी मानले.
साधना विद्यालयात गुरूपौर्णिमा साजरी
Related tags :
Thanks for sharing your thoughts on wyciszanie mieszkań.
Regards