पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली येथे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि लोणीकंद पोलिस यांनी केली मोठी कारवाई .सुमारे 57 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त. तसेच दोन व्यक्तींना घेतले ताब्यात घेतले. पुणे शहरातील उपनगरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असून चोरट्या मार्गाने परराज्यातून गुटखा आणला जात आहे, गुटखामाफियांचे पेव फुटले असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
लोणिकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त मिळालेल्या माहिती नुसार मॅपल हॉटेलच्या पाठीमागे, उबाळेनगर येथील विश्वनाथ विठ्ठल उबाळे यांच्या गोडाऊन क्र 1 येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गोवा-गुटखा साठा साठवून ठेवलेला आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या सह संयुक्त कारवाई करून छापा घालण्यात आला. सदर ठिकाणाहून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखू असा सुमारे 57,61,600/- रुपये किंमतीचा अवैध गोवा गुटखा मिळून आला आहे.
यामध्ये महक सिल्व्हर पान मसालाचे 28288 पाकिटे तर एम1 जर्दा ची 28080 पाकिटे मिळून आली.
त्यानुसार लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु र नं 708/2019 भा दं वि कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात गोडाऊन मालक नरेंद्र विश्वनाथ उबाळे व गुटखा विक्री व साठा करणारा विरमाराम बिजलाजी तराडिया यांना ताब्यात घेण्यात आले आहे
यावेळीअन्न व औषध प्रशासनाचे संतोष सांवत , ए एस गवते, आर आर काकडे हे उपस्थित होते.
ही कारवाई संदीप पाटील सो (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विवेक पाटील सो (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), डॉ. सई भोरे-पाटील मॅडम (उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग) या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (पोलीस निरीक्षक- गुन्हे), सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उप निरीक्षक संतोष लांडे ,पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
पुणे शहरातील उपनगरांमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू आहे, गुटखा सप्लाय करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत, यावर अंकुश बसविताना पोलिसांना नाकी नऊ येत आहेत.
The most talked about weight loss product is finally here! FitSpresso is a powerful supplement that supports healthy weight loss the natural way. Clinically studied ingredients work synergistically to support healthy fat burning, increase metabolism and maintain long lasting weight loss. https://fitspresso-try.com/