पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
महापालिकेतील भाजप सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असून केवळ प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आल्यामुळे जाणून-बुजून पाणीपुरवठा विस्कळीत केला जात आहे आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक चेतन तुपे यांनी दिला आहे.
2017 झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आलेले आहेत, आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 22 चारही नगरसेवकांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून प्रभाग क्रमांक 22 मध्ये सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही, अवेळी पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून बैठका घेऊनही अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे.
पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले केवळ नागरिकांमध्ये नगरसेवककांविषयी नाराजी निर्माण व्हावी या कुटील हेतूने भाजप सत्ताधारी आपल्या पदांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत त्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
प्रचंड झालेल्या पावसामुळे सर्व धरणे भरलेली आहे तसेच पाणीपुरवठा पुणे शहरात सुरळीत आहे, परंतु आमच्या प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत का नाही, असा सवाल करीत जर येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर नागरिकांच्या वतीने प्रचंड आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक चेतन तुपे, बंडूतात्या गायकवाड, हेमलता नीलेश मगर, पूजा समीर कोद्रे यांनी दिला आहे.
भाजपच्या राजकीय दबावापोटी पाणीपुरवठा विस्कळीत पाणी पुरवा अन्यथा आंदोलन करणार – नगरसेवक चेतन तुपे यांचा इशारा
Related tags :
Subscribe
Login
0 Comments