पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
अल्पसंख्खाक हक्क दिन संपूर्ण जगात साजरा होत आहे.परंतु अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी माञ ख्रिश्चन समाजा विषयीच्या सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
संपूर्ण जगभरात अल्पसंख्खाक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.परंतु आपल्या भारतात माञ याची हवी तशी अमलबजावणी होत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते ख्रिश्चन समाज अल्पसंख्खाक असूनही त्याला गेल्या सत्तर वर्त कोणत्या सोयी-सुविधा शासनाकडून मिळाल्या यावरच अभ्यास करणारी समिती नेमण्याची आवश्यकता आहे.अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या माध्यमातून आम्ही अनेकवेळा वेगवेगळ्या सरकारच्या मुख्यमंत्री व अल्पसंख्खाक मंञी यांना भेटलो.जतंर मंतर,दिल्ली आसो की आझाद मैदान ह्या सर्व ठिकाणी आंदोलने केली परंतु त्याचा अद्याप पर्यंत काही ही उपयोग झाला नाही ही शोकांतीका आहे.गेल्या पाच वर्षात साधे जिल्हा स्तरावर अल्पसंख्खाक सनियंञन समिती देखील गठित केलेली नाही.त्यामूळे चर्च व ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या वर हल्ले करणाराचे प्रमाण वाढले.हे कोणाचे अपयश म्हणायचे.हा खरा प्रश्न आहे.खरे पाहता ख्रिश्चन समाजाला जर त्यांचा अल्पसंख्खाक म्हणून हक्क द्यायचा असेल तर अल्पसंख्खाक मंञालया पासून शासनाच्या सर्व अल्पसंख्खाक विभागात प्रतिनिधित्व द्यावे.तरूणांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.तरच आम्हांला आमचा हक्क मिळाला असे होईल.कारण गेल्या आठ दिवसा पूर्वी च मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही.असे प्रतिपादन अल्पसंख्खाक दिनावर आपले विचार मांडताना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे यावर्षी ख्रिश्चन समाजाच्या हक्क व मागण्यासाठी मा.मुख्यमंत्री व मंञीमंडळाला भेटण्याचा व वेळ प्रसंगी आंदोलने करून न्याय मिळवून घेण्याचा ठराव डाँ.वंदना बेंजामिन, विल्यम चंदनशीव, प्रकाश बेंजामिन, राजेश थोरात, डँनियल ताकवाले, विवेक निर्मळ, आनंद म्हाळूंगेकर,अनिता नायडू,सुनिल कुमार,सँमसन,विवेक पाँल, रिकी, राज, एडके, अँण्ड्रू फर्नाडीस, अमोल शिंदे, प्रमोद बोधक,जयंत रायबोर्डे,विठ्ठल गायकवाड,उल्हास भोसले, डँनिअल तारू, सुजित कुमार व राजू दांडगे यांनी घेतला.
Facebook Page Link
अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाला न्याय कधी ?अल्पसंख्खाक हक्क दिनी ख्रिश्चन महासंघाच्या अध्यक्ष आशिष शिंदे यांचा सरकारला…
Posted by Rokhthokmaharashtra on Thursday, December 19, 2019