पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)ā
माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडांगणावर 27 व 28 डिसेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेमधे वैयक्तिक व सांघिक या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक खेळाडूंनी यश संपादन केले.
वैयक्तिक प्रकारांमध्ये योगासन या क्रीडा प्रकारात मुलांच्या 14 वर्षे गटामध्ये श्रेयस फरांदे (श्री म्हाळसाकांत विद्यालय,आकुर्डी), 17 वर्षे गटामध्ये रतनहरी फड (श्री म्हाळसाकांत विद्यालय,आकुर्डी),19 वर्षे गटामध्ये शुभम जाधव (श्री म्हाळसाकांत विद्यालय,आकुर्डी), महाविद्यालय गटामधे दत्तात्रय काळे (प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी) यांनी प्रथम क्रमाकांचे यश संपादन केले.
कराटे या क्रीडा प्रकारांमध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथील सय्यद अरबाज आणि शेख अश्रफ यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केले. त्याचबरोबर 400 मीटर धावणे व थाळीफेक या क्रीडा प्रकारात अनुक्रमांक किरण मस्के आणि शुभम दौंड यांनी कास्य पदक पटकावले.
तसेच धावणे, गोळाफेक, लांबउडी, थाळीफेक, तायक्वांदो, कराटे इत्यादी खेळामध्ये अनेक खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली.
तसेच सांघिक खेळामधे कबड्डी या क्रीडा प्रकारात मुलांच्या महाविद्यालयीन गटामध्ये रायगड संघ, 19 वर्षे गटामध्ये पिंपरी-चिंचवड संघ, सतरा वर्षे गटामध्ये सिंहगड संघ, 14 वर्षे गटांमध्ये पिंपरी-चिंचवड संघ तर मुलींच्या महाविद्यालय गटामध्ये रायगड, 19 वर्षे गटामध्ये हवेली, 17 वर्षे गटामध्ये हवेली, 14 वर्षे गटामध्ये पिंपरी-चिंचवड या संघांनी विजेतेपदाचा मान मिळवला.
खो-खो या क्रीडा प्रकारांमध्ये मुलांच्या 14 व 17 वर्षे गटामधे श्री शहाजी हायस्कूल सुपे, 19 वर्षे गटामध्ये श्री शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव, महाविद्यालयीन गटामधे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी तर मुलींच्या 14 वर्षे गटामधे न्यू इंग्लिश स्कूल व्हावी, 17 वर्षे गटामधे श्रीराम विद्यालय पडवी, 19 वर्षे गटामधे शहाजी विद्यालय सुपे, महाविद्यालयीन गटामधे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांनी विजेतेपद पटकावले.
व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये मुलांच्या गटात आयुर्वेद महाविद्यालय निगडी याने विजेतेपदाचा मान पटकावला तर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते त्याचबरोबर मुलींच्या गटामध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर तर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर अनुक्रमे विजेता व उपविजेता ठरले.
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर च्या हांडे समर्थ त्याने 100 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, थाळीफेक मध्ये हुंबरे गौरी व खिल्लारे धनंजय यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला तर तायक्वांदो 45 किलो वजन गटांमध्ये उंबरे श्रद्धा हिने प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व विजेत्या खेळाडूंना व संघांना मान्यवरांच्या व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी, येथे बक्षीस वितरण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) श्री. ए. एम. जाधव यांनी या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
यासाठी संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडाशिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व खेळाडू व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Facebook Page Link
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्नपुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण…
Posted by Rokhthohk Mahararshtra News on Saturday, December 28, 2019