पुणे

एम्प्रेस गार्डन मध्ये रंगीबेरंगी फुलांची रेलचेल : पुष्पप्रदर्शन म्हणजे पुणेकरांना पर्वणीच ; 17 ते 26 जानेवारी प्रदर्शनाचे आयोजन

हडपसर :(रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन) रेसकोर्सजवळील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत विविध प्रकारची फुले बहरली आहेत. येथे एक दोन नव्हे, तर असंख्य सिझनल व रानफुलांच्या रंग सोहळ्यात हे उदयान न्हावून निघायला सुरुवात झाली आहे.
उदयानात शेलोशिया, झेंडू, डायनथस, सालबिया, कोलियस, कोडीया, स्पंद तेरडा, चवर, डीपकांडी, टूथब्रश, आभाळी, निलिमा, अबोलिमा, नभाळी, पिवळी सोनकी, गुलाबी तेरडा, रानहळद पांढरी, पिवळी, लाल, तपकिरी, कापरू, वाई तुरा, अशी फुले दिसू लागली आहेत. एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 17 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान भरणार आहे. त्याच्याच तयारीचा भाग म्हणून या उदयानात विविध फुल झाडांची लागवड केली आहे.
या पुष्प प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या, कुंड्यांची आकर्षक मांडणी. मनमोहक फुलांची मांडणी, पाने, फुले वापरून तयार केलेल्या विविध पुष्परचना आणि विविध प्रकारचे प्रदर्षणीय स्टॉलचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी दिली.
देशातील विविध ठिकाणांहून आणलेले विविध प्रजातींचे गुलाब पाहण्याची संधी या प्रदर्शनात पुणेकरांना मिळणार आहे. विविध रंगबेरंगी रंगाची उधळण करीत असलेल्या या फुलांचा आनंद लुटण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. ब्रिटिशकालीन बाग म्हणून ओळखले जाणारे एम्प्रेस गार्डन हे आपल्या वेगवेगळ्या वैशिष्टयांसाठी प्रसिध्द आहे. विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या या बागेत विविध प्रकारची झाडे, फुले, लहान मुलांसाठी उपल्बधअसणारी खेळणी उपल्बध आहेत.
गर्द वनराई, पक्षांचा किलकिलाट, रम्य वातावरण अशी एम्प्रेस उदयानाची ओळख आहे. लहान मुलांसाठी मोठया प्रमाणात खेळणी उपल्बध असून, मैदानी खेळ खेळण्यासाठी मुबलक जागादेखील उपल्बध आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी झाडांचा, पक्षांचा अभ्यास करण्याची आवड असणा-यांना चांगली संधी उपल्बध होते.
नागरिक संजय कोद्रे म्हणाले, सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी मजा असते. शाळेचे तास नाही, अभ्यास नाही याउलट मनसोक्त खेळायचे, फिरायचे असाच अनेकांचा दिनक्रम असतो. लहान मुलांनी सुटीचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी महिन्यातून एक वेळेस आम्ही मुलांना घेउन एम्प्रेस उदयानात येतो. त्यामुळे मुलांना निसर्गाच्या सानिध्यात खेळता येते. त्यामुळे मुले या उदयानात आल्यावर खूप खूष होता.

 

Facebook Page Link

https://m.facebook.com/story.php?story_fbid=117521433085287&id=112080646962699

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x