पुणे

विकासकामांवर आजी माजी आमदार आमनेसामने , केशवनगर रस्ता मंजूर होऊन पाच वर्षे रखडला ; सत्ता गेल्यावर माजी आमदाराला आली जाग

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन

हडपसर (प्रतिनिधी)
विद्यमान आमदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर दबाव आणून रस्त्याचे काम थांबविल्याचा आरोप माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे मात्र वर्कऑर्डर 2015 साली निघूनही पाच वर्षात रस्ता न केलेल्या माजी आमदारांनी एक महिन्यातच विद्यमान आमदारांवर आरोप केल्याने टिळेकरच टीकेचे धनी बनले आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता 8 ऑक्टोबर 2015 रोजी केशवनगर येथे 85 लाख रुपये निधी मंजूर होऊन रस्त्याची वर्कऑर्डर निघाली होती मात्र गेल्या पाच वर्षात हा रस्ता होऊ शकला नाही आता आंदोलन करून माजी आमदार कोणाला जाब विचारत आहेत असा सवाल नागरिक करत आहेत.

85 लाख रुपये निधी मिळूनही पाच वर्षात या रस्त्याचे काम काही झाले नाही, येथे ड्रेनेज लाईन जलवाहिन्या व वीजेचे दिवे या सर्व व्यवस्था करणे अत्यावश्यक असताना आजवर काहीही काम केले नाही. आता मात्र माजी आमदारांना पराभव झाल्यावर जाग आली आहे.
विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी केशवनगर भागात बैठका घेऊन येथील रखडलेल्या नागरी प्रश्नांबाबत नागरिकांकडे विचारणा केली तेव्हा येथील रस्ता रखडल्याचे निदर्शनास आले त्याची कारणे विचारली असता नागरिकांनी रस्त्यांच्या कामांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे दिसून आले, आमदार चेतन तुपे यांनी चर्चा केल्यावर येथील रस्ते मोकळे होण्यास काहीही अडचणी राहिलेले नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले.
पाच वर्षात रखडलेल्या रस्त्याचे काम होत असल्याने माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण पाच वर्षे तुम्ही झोपा काढल्या काय? रस्त्याचे काम का झाली नाही असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी विकासकामांना प्राधान्य
हडपसर विधानसभा मतदारसंघातील गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा व रखडलेल्या प्रलंबित कामांबाबत योग्यता सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत राजकारण बाजूला ठेवून पाच वर्षे येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल गेल्या पाच वर्षात येथील अनेक प्रकल्प रखडले, जाहिरातबाजी मोठी झाली मात्र आगामी काळामध्ये सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
चेतन तुपे
आमदार हडपसर विधानसभा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x