रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस खऱ्या अर्थाने धकाधकीच्या जीवनात कुटुंब सांभाळून आपले कर्तव्य बजावत असतात महिलांच्या कर्तव्य तत्परतेने आपला समाज सुरक्षित राहतो अशा महिला पोलिसांकडे खऱ्या अर्थानं सन्मानाने पाहण्याचा दृष्टिकोन असावा असावा असे प्रतिपादन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा स्वाती पोकळे यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शालिनी जगताप यांच्या पुढाकारातून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
हडपसर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्या पत्नी सोनल चेतन तुपे, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा पुनम पाटील, उपाध्यक्ष सविता मोरे, वर्षाराजे जाधव, वंदना मोडक, स्वाती चिटणीस, प्रविण सय्यद आदी महिला यावेळी उपस्थित होत्या
पोलीस खात्यामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्यामध्ये कसूर होऊ देत नाहीत समाजामध्ये अनेक घटना घडत असताना महिलादेखील समाज सुरक्षितेसाठी धावून जातात अशा महिलांना सन्मान करून प्रोत्साहन द्यावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शालिनी जगताप यांनी दिली.
यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पोलीस महिला समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटतात – स्वाती पोकळे ; महिला दिन हडपसर पोलीस महिलांचा सन्मान ; शालिनी जगताप यांचा पुढाकार…
Related tags :
Subscribe
Login
0 Comments