रोखठोक महाराष्ट्र न्यूज
पुणे (प्रतिनिधी)-
राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टकडून कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अहोरात्र काम करत असलेल्या शासकीय यंत्रणांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला चाळीस हजारांची मदत देण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर संघटक बाळासाहेब राजे जाधवराव यांनी बोलताना दिली.
संपूर्ण चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जगभर थैमान घालत असून भारत देशात कोरोनाचे रुग्ण सर्वत्र सापडत असल्याने शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहे,आरोग्य, पोलीस,वीज मंडळ अशा शासकीय यंत्रणांचे हजारो कर्मचारी कोरोनाच्या विरोधात समाजाचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत.
देशाचे हे सुपुत्र नागरिकांसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे,त्यांच्या मदतीसाठी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ४०,००१ रुपयांची मदत देण्यात आली आहे. पराक्रम, देशप्रेम, त्याग पिढीजात रक्तात असल्याने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपलं उत्तरदायित्व निभावण्यासाठी ही मदत करण्यात आली असून कोरोनाच्या या लढाईत आम्ही देशाच्या प्रशासकीय यंत्रणेबरोबर आहोत, समाजातील इतर समर्थ सेवाभावी संस्था आणि घटकांनी या संकटसमयी मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी बाळासाहेब राजे जाधवराव यांनी केले.
Great info. Lucky me I discovered your site by chance (stumbleupon).
I’ve book-marked it for later!