पुणे (प्रतिनिधी)
हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत तसेच नागरिकांनी उपाययोजना केल्याने प्रतिबंधीत क्षेत्रात शिथिलता आणावी अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघातील अनेक ठिकाणचे कोरोनाबधित रुग्ण बरे झाल्याने त्या ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कमी करणेबाबत आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांना आमदार चेतन तुपे यांनी विनंती पत्र दिले. हडपसर मतदार संघातील माळवाडी, सय्यद नगर, चिंतामणी नगर, कोंढवा ते एन आयबीएम परिसर, वेताळ बाबा वसाहत, महात्मा फुले वसाहत, इंदिरा नगर व आदर्श कॉलनी, हांडेवाडी रोड, काकडे वस्ती व पुण्यधाम आश्रम रोड, कोंढवा बुद्रुक या ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात यावे यासाठी आग्रही मागणी केली व त्यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
कोरोना प्रचार व लॉक डाऊन मुळे नागरिक भयभीत झाले आहेत, हडपसर मध्ये सोशल डिस्टन्स चा वापर केला जातो पोलीस अन प्रशासनाने चांगली कामगिरी बजावली आहे, कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, अनेकांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत, आगामी काळात मोठ्या प्रमाणात मंदीचा फटका जाणविणार असल्याने पालिकेने प्रतिबंध शिथिल केले पाहिजे, नागरिकांनी वावरताना आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
चेतन तुपे
आमदार – हडपसर विधानसभा