पुणे (प्रतिनिधी)
कोरोना विषाणू विरोधात सक्षमपणे लढताना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना प्रभाग क्र.23 व हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग प्रमुख अमित गायकवाड यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते3.
बुधवारी सकाळी 10 ते सायं 6 या वेळेत आयोजित रक्तदान शिबीरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे व ज्यांनी या कार्यात मोलाची मदत केली त्यांचे अमित गायकवाड यांनी आभार मानले.
रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार महादेव अण्णा बाबर यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, माजी नगरसेवक विजय देशमुख, स्विकृत नगरसेवक अविनाश काळे, संजय शिंदे, महेश ससाणे, राजाभाऊ डांगमाळी, जान मोहम्मद शेख, नितीन गावडे, महेंद्र बनकर, गणेश जगताप, सागर जगताप, दत्ता खवळे, सुनील मुंजी, बाबू काळे, मनीष भाऊ डाळींबकर, मुकेश सोनवणे, रामदास रासकर, संतोष ननावरे, दत्ता घुले, नीता भोसले, विद्या होडे, शितल संजय शिंदे, आबा कचरे, बबलू खंडे, पंकज पांडे, प्रणव विजय मोरे, अमोल सिन्नरकर, सागर ढेंबे, राहुल काळे, सुयोग जाधव, शशी पांडव, सरफराज शेख, नितीन ससाणे, राजू कांबळे, विजय नायर, विकास सुतार, संजय मेहता, आकाश कोठावळे यांनी भेट दिली.
रक्तदान शिबिरासाठी श्रीकृष्ण मेटे व पप्पू बिराजदार यांनी जागा उपलब्ध करून दिली.
श्री. गजानन महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष सचिन मेटकर व मनोहर देशमुख यांनी चहापान नाश्ता यांची व्यवस्था केली होती.
रक्तदान शिबिर उपक्रम यशस्वी होण्यासाठी महेश सुतार, गणेश गोंजारी, सुशिल जाधव, पंकज काकडे, अप्पा भगत, विशाल माने, शुभम जाधव, राज राऊत, कुलकर्णी काका, प्रकाश महाडिक, शंकर सावंत, निलेश भगत, रितेश मोहिते, विजय भैय्या ससाणे, पप्पू होले, रणजित चव्हाण, मोहन बलाई, संदेश जाधव, प्रतिक रावडे, अक्षय मंगरुळे, ओंकार गदादे, चेतन बोऱ्हाडे, शुभम तिवारी आदिंनी मोलाचे सहकार्य केले.
पुणे रक्तपेढी यांनी रक्तसंकलनं नियोजन केले. अमित गायकवाड यांनी शिबिराचे आयोजन केले.