पुणे

पॅरोलवर सुटलेल्या खुनातील आरोपींची काढली रॅली; पोलिसांनी केली अटक पिंपरी आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याचाही सहभाग

येरवडा (प्रतिनिधी) – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून सुटका झाल्यावर चारचाकी वाहन तसेच दुचाकीवरून रॅली काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून यात पिंपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांनी यांच्याकडून एक गावठी पिस्टल पाच जिवंत काडतूस चार आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.
पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यानी फिर्याद दिली असून यात पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय 36,रा भोसरी)आझाद शेखलाल मुलाणी (वय 30,रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे (वय 21, रा.निगडी ), मुबारक बबन मुलाणी (वय 38 रा. चिखली), संदीप किसन गरुड (वय 40, रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय 43, रा. मुळशी), सिराज राजू मुलाणी (वय 22, रा. मुळशी), विनोद नारायण माने (वय 26, रा.मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी रात्री खुनाच्या आरोपातील समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार होती. त्यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ नातेवाईक व मित्रमंडळी चारचाकी वाहनातून व दुचाकीवरून आले होते. हे सर्वजण विश्रांतीवाडी पोलीस स्टेशनसमोरून आरडाओरडा करीत जात होते. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस हवालदार दिनकर लोखंडे, पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे, वामन सावंत, अनिकेत भिंगारे यांनी या हुल्लडबाजी करणाऱ्यांनाचा पाठलाग करून फुलेनगर जवळ अडवून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळील वाहनातून एक गावठी पिस्टल काडतूस आणि लोखंडी बार आढळून आला. या सर्वांवर आर्म अक्टनुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र कोविड 2019 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक पंकज देशमुख सहायक पोलीस उपायुक्त लक्ष्मण बोराटे भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.
करोना विषाणूच्या पार्श्ववभूमीवर येरवडा कारागृहातून अनेक कैद्यांची जामिनावर व पॅरोलवर सुटका करण्यात येत आहे. या कैदयांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक कारागृह परिसरात गर्दी करीत असतात. दुपारपासून ही मंडळी कारागृहाच्या आसपास बसलेली असतात. यातून गंभीर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x