पुणे (प्रतिनिधी)
सध्या राज्यभर कोरोना महामारी ची संकट घोंगावत आहे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत या काळात शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून टाळेबंदी जाहीर केली होती त्याचे परिणाम गेल्या चार महिन्यापासून अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालू नाही अनेकांच्या हाताला काम मिळाले नाहीत अनेक जणांची हालाखीची परिस्थिती झालेली असुन पालक आणि महाविद्यालय सुद्धा याला अपवाद नाहीत. शाळा महाविद्यालय यामुळे गेली चार ते पाच महिने बंद आहेत त्यामुळे महाविद्यालयीन कामकाज बऱ्यापैकी कमी झाले आहे आणि विद्यालयांची वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नसुन परिणामी महाविद्यालयांना कुठलाही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमावर कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन ऑनलाइन वर्ग चालू केले आहे
राज्य सरकारने सूचित केल्याप्रमाणे चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून शुल्क घेण्यात यावा व सदर कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्काबाबत सहकार्य करावे कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे अस्थाना देखील मात्र काही ठिकाणी विद्यालय शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना दिसून येत आहे अशी च घटना पुण्यातील नामांकित फार्मसी कॉलेज च्या बाबतीत घडली
असता तेथील विद्यार्थ्यांनी
फार्मसी स्डुडंट काॅन्सिल ऑफ महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम चांगण,उपाध्यक्ष हर्षल गांधी व कार्याध्यक्ष दिग्विजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना २ तासाच्या आत न्याय मिळवून दिला.