पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग पुन्हा एकदा कलाकारांच्या प्रश्नासाठी मैदानात छोटेखानी कलाप्रकार सादर करण्यास लवकरच मिळणार परवानगी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग पुन्हा एकदा कलाकारांच्या प्रश्नासाठी मैदानात

छोटेखानी कलाप्रकार सादर करण्यास लवकरच मिळणार परवानगी

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन) छोटेखानी कलाप्रकार सादर करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश तर्फे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील म्हणजेच
पुणे, लातूर,बीड,उस्मानाबाद पिंपरी चिंचवड,सातारा,कोल्हापूर ई. आयुक्त व कलेक्टर यांना आज निवेदन देण्यात आले, सर्व स्थानिक कलाकारांना मग तो भारुड गोंधळी, ऑर्केस्ट्रा, संगीत रजनी, संगीत बारी, जादूगर, नृत्य करणारे, वाघ्या मुरळी, असतील अशा सर्व स्तरातील छोटाखानी कलाकारांना लवकरात लवकर कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या सर्व शहराध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांनी आप आपल्या शहराच्या ठिकाणी जाऊन ही निवेदने दिली,सर्व आयुक्त व कलेक्टर यांनी लवकरात लवकर ह्या संदर्भात जीआर काढून कलाकारांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्य समन्वयक संतोष साखरे,
पुणे जिल्हा अध्यक्ष प्रिया बेर्डे, शहराध्यक्ष प्रमोद रणवरे,
लातूर जिल्हा अध्यक्ष शाम राऊत,
सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे,
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद अष्टेकर,
कोल्हापूर शहराध्यक्ष उमेश बोळके,पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय पानसरे,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष विशाल शिवांडे,
बीड कार्याध्यक्ष संतोष वारे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉ.सुधीर निकम,
ठाणे शहराध्यक्ष प्रियदर्शन जाधव,उपाध्यक्ष कौस्तुभ सावरकर ई.सर्वांचा या कार्यात मोलाचा सहभाग व सहकार्य लाभले असे मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेले सात महिने कलाकारांना कोणतेही काम मिळालेले नाही सर्व थेटर्स, होणारे शूटिंग, कला सादर करण्याचे विविध प्रकार बंद असल्या कारणामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे गेले अनेक महिने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कलाकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज देखील याचाच भाग म्हणून ही निवेदने संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आली तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील देण्यात आलेली आहेत या गोष्टींवर उपायोजना होऊन कलाकारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास चित्रपट व संस्कृत विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला तसेच सर्व शहरातील आयुक्त व कलेक्टर यांचे आभार त्यांनी यावेळी मांडले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
7 months ago

Great article, just what I needed.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x