पुणे (प्रतिनिधी)
“कोव्हीड 19” मुळे पुण्यात रोजगार घटला याचा परिणाम म्हणून गरिबांना दिवाळी साजरी करण्यात अडचणी येत आहेत, गरिबांच्या घरी दिवा लागावा म्हणून स्पिरीचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या प्रेरणेतून अमीर कंपनीच्या वतीने गरिबांना मोफत राशन वाटप केले गरिबांच्या मुखावरील समाधान हीच खरी दिवाळी असल्याचे मत कंपनीचे चेअरमन विजय मोरे यांनी व्यक्त केले.
हडपसर येथील मेगासेंटर येथे परिसरातील गरजू कुटुंबाना दिवाळी राशनचे वाटप करण्यात आले यावेळी छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
फाउंडेशनचे केंद्रीय महासचिव अनिल मोरे, अमीर कंपनीचे संचालक प्रशांत निकम, कंपनीचे सीईओ मधुकर गुळींग व अमीर कंपनीचे स्ट्रॅटजी मॅनेजर धनंजय वळकुंजे आदी यावेळी उपस्थित होते.
S.S.C.F प्रमुख आदरणीय कमला सेतीया माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करत आहे, आगामी काळात सामाजिक कार्यात संस्थेच्या वतीने मोलाची कामगिरी केली जाणार असल्याची माहिती फाऊंडेशन चे केंद्रीय महासचिव अनिल मोरे यांनी दिली.
अनेक कुटूंबाना यावेळी दिवाळी राशन देऊन खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला, व माणुसकीचे दर्शन घडविले.
यावेळी गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिल्याने महिलांनी फाउंडेशन व अमीर चिकन कंपनीचे आभार मानले.
S.S.C F व अमीर कंपनीकडून मदतीचा हात गरिब गरजूंच्या घरी दिवाळी उजळली
Subscribe
Login
0 Comments