सामाजिक परिवर्तन आणि प्रगतीसाठी बहुमोल योगदान देणाऱ्या शरद पवार साहेब यांचा वाढदिवस म्हणजे एका कणखर नेत्याचा कृतज्ञता गौरव दिवस म्हटला पाहिजे. जनतेचे उदंड प्रेम पवार साहेबांना मिळाले. यशवंतराव चव्हाण यांचा द्रष्टेपणाचा वारसा त्यांनी जोपासला .गुणवत्तेला संधी देणारे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारे दीनदुबळ्या समाजाला न्याय देणारे कलावंत व ज्ञानवंतांना प्रोत्साहन देणारे शरद पवार हे चैतन्याचा महामेरू आहेत. सामाजिक प्रश्नांचे आणि शेती विषयाचे बारकावे माहीत असणारे शरद पवार साहेब हे लोकं सिद्ध नेतृत्व आहे. गुणग्राहकता आणि स्मरणशक्तीचे वरदान लाभलेल्या या नेत्याने अनेक प्रतिभावंतांना आणि कार्यकर्त्यांना जी ऊर्जा दिली तीच उर्जा आज नवनिर्मितीला प्रेरक ठरत आहे. माणसं सांभाळायची हातोटी आणि कामाची चिकाटी ही साहेबांची स्वभाववैशिष्ट्य आहेत. समाजाच्या स्थितीगतीची प्रश्नांची आणि गुंतागुंतीची प्रगल्भ जाण असणाऱ्या पवार साहेबांना राष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी दीर्घायुष्य मिळावे अशी सद्भावना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केली. ते एस. एम. जोशी महाविद्यालयात साधना शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेत `चैतन्याचा महामेरू: शरद पवार `या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस .टी .पवार होते. ते म्हणाले की, तीव्र बुद्धिमत्ता आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर राजकारणात राहून सामाजिक बांधिलकीचा वसा पवार साहेबांनी जोपासला. रयत शिक्षण संस्थेला पवार साहेबांनी नवे वळण दिले. असे ते म्हणाले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. ते म्हणाले की, मा. शरदरावजी पवार साहेबांचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आजही युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्याव्यात. पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणा देणारे आहे,असे विचार त्यांनी व्यक्त केले. या ऑनलाईन व्याख्यानाला सौ. सुजाता कालेकर, सौ. लक्ष्मी आहेर, सौ.तमन्ना सय्यद,सौ.झीनत सय्यद आदी सर्व साधना शैक्षणिक संकुलाचे शाखाप्रमुख, उपप्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे ,डॉ. एम. आर. जरे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन व्याख्यानाला उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.शकुंतला सावंत यांनी केले. आभार प्राचार्य, विजय शितोळे यांनी मानले.
जनतेचे उदंड प्रेम पवार साहेबांना मिळाले – डॉ.यशवंत पाटणे
Subscribe
Login
0 Comments