पुणे (प्रतिनिधी)
विविध क्षेत्रात कार्यरत नवरत्नांचा होणारा सन्मान, त्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचे काम, त्यांना पुरस्कार रुपी शाबासकी देऊन त्यांच्या कार्यास अधिक बळ देण्याचे कार्य राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करित आहेत.संत शिरोमणी सावता माळी यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर हे तुकाई दर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात येणाऱ्या लोककल्याण साधना गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले संत सावता महाराज हे कार्यात विठ्ठल पहात, तसेच राजाभाऊ होले हे ही सामाजिक कार्यातच देव पहातात. याप्रसंगी व्यासपिठावर शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, नगरसेवक गणेश ढोरे, लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले ,लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे,उद्योगपती विशाल कामठे,सागर पिलाणे,दिपक भोसले,रमेश निवंगुणे आदि उपस्थित होते. याप्रसंगी लोककल्याण राष्ट्र साधना गौरव पुरस्कार- नि.सहा.पो.उपनिरिक्षक लक्ष्मण थोरात,समाज साधना-शादाब मुलाणी, पत्रकारिता साधना-संदिप जगदाळे, सहकार साधना-महेश ससाणे,उद्योग साधना-सुनिल पिलाणे,ज्ञान साधना-ज्ञानेश्वर पिलाणे,धर्म साधना-अनिल जैन,क्रिडा साधना-तुषार पवार,मात-पितृ गौरव मोतीराम कोरे व शिवगंगा कोरे यांना शाल श्रीफळ मानचिन्ह,मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजाभाऊ होले गेली कित्येक वर्षे सातत्याने करित असलेले विधायक कार्ये इतरांनाही दिपस्तंभासारखे आहे. प्रास्ताविक दिलीप भामे,मानपत्र वाचन प्रा.एस.टि.पवार,सुत्रसंचालन प्रदिप जगताप,तर आभार हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद सातव,प्रविण होले,प्रभाकर शिंदे,राहुल भाडळे व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.