पुणे ः प्रतिनिधी
कोणतेही काम मनापासून केले, तर त्यामध्ये समाधान मिळते आणि समाज तुमच्या पाठीशी काम उभा राहतो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे या भावनेतून आम्ही वडकीनाला (ता. हवेली) येथे गंगा तारा वृध्दाश्रमच्या माध्यमातून काम सुरू केले आहे, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे संसस्थेच्या संस्थापिका नीता भोसले यांनी सांगितले.
प्रजासत्तादिनाचे औचित्य साधून कानिफनाथ फांडेशनच्या वतीने गंगा तारा वृद्धाश्रम फाउंडेशनला बारा फॅन, दहा खुर्च्या भेट दिल्या. तसेच तसेच सर्वांसाठी स्नॅक्स व भोजन दिले. यावेळी फाउंडेशनचे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी वृध्दांची आपुलकीने चौकशी केली.
अॅड. लक्ष्मी माने म्हणाल्या की, स्वतःसाठी प्रत्येकजण जगत असतो. मात्र, दुसऱ्यासाठी जगण्यात जो आनंद आहे, तो पैशामध्ये मिळत नाही. ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून गंगातारा वृद्धाश्रम सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त असा अगळा वेगळा कार्यक्रम कानिफनाथ फाउंन्डेशनने घेतल्याबद्दल सर्व आयोजक व संयोजकांचे ग्रुपमधील प्रत्येक सदस्याचे वृध्दाश्रमातर्फे आभार मानले.
समाजसेवा हीच ईश्वर सेवा ः नीता भोसले
Subscribe
Login
0 Comments