पुणे

प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि. 4 : प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण स्तरावर लोकसहभाग घेत प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासणी व कारवाई करणे आवश्यक आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे अशासकीय सदस्य हरिष खोमणे, संदीप नवले, सुरेश रास्ते, नेहा पंचामिया, मोहन मते, सचिन मोकाटे, शंभु पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, पोलीस उप अधीक्षक अमृत देशमुख, वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक विजया करांडे, देहु रोड कॅन्टोन्मेंटचे एम.ए.सय्यद आदी उपस्थित होते.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री देशमुख म्हणाले, पोलीस, पशुसंवर्धन तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात वन्य प्राणी आल्यास याबाबत मार्गदर्शका तयार करावी, यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे. प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणा-यांना आळा बसेल व जागृतीही होईल. समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी प्राणी क्लेश समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन, पोलीस, वनविभाग तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

온라인카지노 , 실시간카지노 , 온라인카지노 , 온라인카지노 , 토토커뮤니티 , 온라인카지노 , 온라인카지노 , 메이저사이트 , 카지노드라마 , 메이저토토사이트 , 얀카지노

4 months ago

I was looking at some of your articles on this internet site and I
think this internet site is real informative! Keep on putting up.Money from blog

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x