पुणे

पत्रकारांना लवकरच कोविड लस दिली जाईल- आमदार चेतन तुपे – युवा पत्रकार कै. संदीप जगदाळे यांना ऑनलाइन झूम अॅपवर मान्यवरांनी वाहिली आदरांजली

हडपसरमधील युवा पत्रकार कै. संदीप जगदाळे यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यानिमित्त ऑनलाइन झून अॅपवर शोकसभेमध्ये हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन आदरांजली अर्पण केली. आमदार तुपे म्हणाले की, पत्रकार म्हणून जगदाळे यांचे काम नक्कीच मोलाचे ठरले आहे. ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती देवो, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर फ्रंटलाइन वर्कर म्हणून हडपसरमधील पत्रकार बांधवांना कोविड लस देण्याचे नियोजन लवकरच केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
शोकसभेमध्ये आमदार चेतन तुपे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजय कोलते, भारती बँकेचे चेअरमन बी. बी. कड, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी के.डी. रत्नपारखी, साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे, नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, नगरसेवक योगेश ससाणे, हडपसर मेडिकल असोसिएशनचे डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. मंगेश बोराटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, अनिल मोरे, दिगंबर माने, विवेक काटमोरे, स्वप्नील धर्मे, तुषार पायगुडे, व्हिजन हडपसर चे दिपक कुदळे, पल्लवी सुरसे, रोहीनी भोसले, दीपक गायकवाड, काँग्रेसचे नितीन आरु, शोएब इनामदार, बापू जगताप, राजाभाऊ होले, यांच्यासह संदीप जगदाळे यांचे कुटुंबीय, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
युवा पत्रकार कै. संदीप जगदाळे यांच्या कार्याचा गौरव केल्याने कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कै. संदीप जगदाळे मूळचे मूर्टी (ता. बारामती, जि. पुणे) गावचे. त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर एमएसडब्ल्यू (समाजसेवक) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये म्हणून नोकरी केली. नोकरी करीत असताना टिळक विद्यापीठामध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही दिवस दै. लोकमत आणि त्यानंतर आजपर्यंत दैनिक सकाळमध्ये हडपसरचे पत्रकार म्हणून काम करीत कामाचा वेगळा ठसा उमटविला. समाजातील विविध घटकांना बातमीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत असताना कंठ दाटून आला.
संदीप जगदाळे सारख्या उमद्या युवकास कोरोनामुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले.
ऑनलाइन झूम शोकसभेचे संचालन पत्रकार अनिल मोरे यांनी केले होते. आयोजन व्हिजन हडपसर व स्व.संदीप जगदाळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x