पुणे, प्रतिनिधी
मगरपट्टा सिटीचे संचालक आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज बुधवारी (दि. २ जून २०२१) दुपारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, दोन पुतणे, एक पुतणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, रिव्हर व्ह्यू सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीष मगर यांचे ते वडिल होतं. माजी खासदार स्व. अण्णासाहेब मगर यांचे ते धाकटे बंधू होत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता.
उद्योजक सतीश मगर यांना पितृशोक – आबासाहेब मगर यांचे निधन
Subscribe
Login
0 Comments