पुणे
जेव्हा एखादा प्रतिनिधी नागरिकांच्या मतदानाने निवडून येत नाही तरी सुद्धा संविधानाच्या जोरावर आणि ताकतीवर एखाद्या पदावर बसत असेल तर त्यांनी हे भान ठेवायला पाहिजे कि, ज्या संविधानामुळे येथे पोहचलो आहोत त्या संविधानावर अवमान जनक आपण कसे बोलू शकतो? यांचा अधिकार कोणीही तुम्हाला दिला नाही. जो व्यक्ती संविधानाचा अपमान करतो त्याला संविधानाने दिलेल्या कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नाही. आज या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून गणेश बिडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना दिलेल महानगरपालिकेतील सभागृह नेते पद रद्द करण्यात यावे ही मागणी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका पल्लवी चंद्रशेखर जावळे यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधानाचा अवमान केल्याबद्दल बीजेपीचे पदाधिकारी व पुणे मनपाचे सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या विरोधात शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या ) वतीने तिव्र निदर्शने देऊन व घोषणाबाजी करत निषेध वर्तवण्यात आला यावेळी जावळे बोलत होत्या.
संत कबीर चौक, नाना पेठ, पुणे येथे झालेल्या या निषेध आंदोलनाप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे,
विधानसभा प्रमुख अभय वाघमारे, उपशहर संघटिका नगरसेविका पल्लवी चंद्रशेखर जावळे,
उपविधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, उपशहर संघटक चंद्रशेखर जावळे, पद्मा सोरटे, नागेश शिंदे,
रोहिणी कोल्हाड, सुदर्शना त्रिगुणाईत, देविका घोसरे, सबिया सेख तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा
मतदारसंघांमधील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना अधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.