पुणे

१५ ऑगस्ट पूर्वी दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करणार – रोहन सुरवसे पाटील

पुणे ः प्रतिनिधी
स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने मुद्रांक महानिरीक्षक पुणे यांच्याकडे ७ व ९ जुलै रोजी हवेली क्र. 27 निबंधक अजित कुमार फडतरे यांनी नोंदणी बेकायदेशीरपणे 9807/2020 हा दस्त नोंदवला आहे. याबाबत तक्रार देऊन तीन महिने झाले तरी अद्याप कारवाई केली गेली नाही, त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी दखल घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी दिला.

सुरवसे म्हणाले की हवेली क्र.27 या कार्यालयातील गैरकारभाराबाबत महसूल, राज्य शासन, नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी उप महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. त्याच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट 2021 पूर्वी दोषींवर योग्य कारवाई झाली नाही, तर नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणेचे आय जी आर श्रावण हर्डीकर व नोंदणी उपमहानिरीक्षक(मुख्यालय) महाराष्ट्र राज्य पुणेचे डीआयजी गोविंद कराड यांना समक्ष भेटून निवेदन दिले असून, त्यांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.

यासदर्भातील तक्रार कार्यालयात दाखल झाली असून, कार्यालयाने दखल घेतली आहे. संबंधिताना चौकशीचे आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानतर दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिले.