पुणे

भूलतज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. एच. के. साळे यांची निवड

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
राज्यातील भूलतज्ञांच्या संघटनेतर्फे नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे यांची “प्रेसिडेंट इलेक्ट 2021” या पदासाठी बहुमताने निवड करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची निवड झाली आहे ते गेली तीस वर्ष भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. एच. के. साळे म्हणाले आज साडेतीनशे बीडचे एनएबीएच अक्रीडेटेड अद्ययावत रुग्णालय चालवत असताना आलेला प्रशासकीय अनुभव वापरून राज्यस्तरावरील तज्ञांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, तसेच या क्षेत्रातील संशोधनालाही चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, संघटनेचे अद्ययावत कार्यालय बनवणे राज्यस्तरीय संघटनांमध्ये संवाद वाढवणे यास आपण बांधील राहू.
डॉ. एच. के.साळे हे पुण्याच्या पूर्व भागातील प्रसिद्ध नोबल हॉस्पिटल चे कार्यकारी संचालक असून दोन वर्षाच्या कोरोना काळात या हॉस्पिटलमधून अनेकांना जीवदान मिळाले आहे, पूर्व भागातील अत्याधुनिक रुग्णालयांमध्ये नोबलचा समावेश असून सर्व प्रकारचे आधुनिक उपचार करण्यास हॉस्पिटलचा पुढाकार असतो, भुलतज्ञ मध्ये ते सिनिअर डॉक्टर असून त्यांनी सर्व प्रकारच्या प्रक्रिया पार पाडल्याने त्यांची बहुमतांनी निवड झाली.
त्यांच्या या निवडीबद्दल नोबल हॉस्पिटल चे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.