हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
जर्मनी येथिल हैम्बर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्यनमॕन या स्पर्धेत हडपसर येथिल सुप्रसिद्ध उद्योगपती दशरथ जाधव यांनी सहाव्यांना या पुरस्काराला गवसनी घातली, तर प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल झांजुंर्णे यांनी पहिल्याच प्रयत्नात हा पुरस्कार पटकाविला.
त्यांचा लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप भामे, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी, सचिव विनोद सातव, सहसचिव इंद्रपाल हत्तरसंग, प्रा.एस.टि.पवार, राजु सावळगी, चंद्रकांत वाघमारे, प्रभाकर शिंदे, प्रविण होले आदि उपस्थित होते. याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना राजाभाऊ होले म्हणाले, दशरथ जाधव यांनी तरूणाईला लाजवेल अशी कामगिरी केली, त्यांनी यात दशकिय कामगिरी करुन रेकार्ड नोंदवावा. तसेच डॉ. राहुल झांजुर्णे यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे, त्यांना दोन्हीही क्षेत्रात उत्तोरत यश व किर्ती लाभो.