पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी)

युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे. कोरोनाच्या काळात आज तरुणाई बंदिस्त झाली आहे . 21 व्या शतकातील तरुणाई ही माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आरूढ झाली आहे . राष्ट्रीय सेवा योजना ही स्वतःबरोबर राष्ट्रावर प्रेम करायला शिकवते .एकविसाव्या शतकातील तरुणाई हीच पॉवर आहे. राष्ट्र उभारणीचे काम राष्ट्रीय सेवा योजनेत केले जाते. राष्ट्रहितासाठी काम करूया. श्रमाने माणूस मोठा होतो .भारत महासत्ता होण्यासाठी प्रत्येक युवकाने श्रम केले पाहिजेत . युवकांनी उत्तम आहार घ्यावा. आरोग्य हीच संपत्ती आहे. व्यसनापासून युवकांनी दूर राहायला हवे .ज्येष्ठ नागरिक ही फार मोठी संपत्ती व संस्कृती आहे. आई-वडिलांवर प्रेम करा, असे विचार माजी संचालक राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापुरचे डॉ. संजय ठिगळे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये “राष्ट्रीय सेवा योजना दिन “प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते .भारताने सुपर पॉवर होण्यासाठी युवकांनी वेळेचे भान ठेवले पाहिजे. तरुणाईचे मन , मेंदू, मनगट मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे. प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधणारी जपानची श्रमसंस्कृती युवकांनी स्वीकारली पाहिजे आणि आपला भारत बलशाली केला पाहिजे .असे विचार त्यांनी मांडले .कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले .आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा शितोळे ,डॉ. ऋषिकेश खोडदे यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. संजय जडे ,डॉ. संजय जगताप, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.