पुणे

भविष्यात दररोज ताजी फळे मिळण्यासाठी १५० रोपांची लागवड कृपाल सिद्धू ः वडकीतील गंगा-तारा वृद्धाश्रमामध्ये राबविला उपक्रम

हडपसर ३ ः समाजाप्रती बांधिलकी राखत वृद्धाश्रमामध्ये एक दिवस फळ वाटप करण्याची प्रथा रूढ आहे. मात्र, त्या पलिकडे जाऊन भविष्यात दररोज ताजी आणि स्वच्छ फळे मिळावीत, यासाठी फळांच्या रोपांची लागवड केली, असे मत रोटरी क्लब ऑफ अमानोराच्या कृपाल सिद्धू यांनी सांगितले.

वडकी (ता. हवेली) येथील गंगा-तारा वृद्धाश्रमामध्ये रोटरी क्लब अमानोरा व अॅम्युकेअर ट्रस्ट आणि मोहनजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. गंगा-तारा वृद्धाश्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा नीता भोसले आणि सचिव अॅड. लक्ष्मी माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कृपालसिंग सिद्धू, अनिस अफसर, कला राघवन, किर्ती खंडेलवाल, अक्षरा राघवन आदी पदाधिकारी उपस्थित होते. अन्नपूर्णा टीमच्या शशी यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते