पुणे (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर साहेब याच्यां वाढदिवसानिमित्त हडपसर विधानसभा
काँग्रेस कमिटीच्या वतीने गाडीतळ, हडपसर येथील घरटे प्रकल्पातील अनाथ मुलांना दिवाळी फराळ व
खाऊवाटप करण्यात आला.
तसेच यावेळी घरटे प्रक्लपातील मुलांची रक्तगट व हिमोग्लोबीन चाचणीही करण्यात आली, याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रशांत मामा तुपे, विजय जाधव, गणेश फुलारे, नितीन आरू,घरटे प्रकल्पाचे संचालक रविंद्र वाघ, स्मिता वाघ, श्री कुंभार, उद्योजक महेश नलावडे, स्वप्निल डांगमाळी, महेश ननावरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन स्वामी गणेश फुलारे, गौरव तुपे, प्रथमेश ढवळे, आदित्य होले व मित्रपरीवाराने
केले होते.
“बेघर मुलांना आधार देण्याचे काम कौतुकास्पद”
“हडपसर येथील घरटे प्रकल्पत बेघर मुलांना राहण्याची व शिक्षणाची संधी पुणे महापालिकेच्या माध्यमातून करून देण्यात आली येथील रतन माळीव त्यांचे सहकारी यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे गरीब व अनाथ मुलांना शैक्षणाचा हक्क मिळवून देणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे.
बाळासाहेब शिवरकर
माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य