हवेली प्रतिनिधी :- अमन शेख। लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ६ अनाधिकृत बांध कामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बांधकाम विभागाने हातोडा चालविला. बुधवारी (दि. १७) सकाळी ९:३० ते १२ दरम्यान पीमआरडीएने ही कारवाई केली.
थेऊर फाटा कुंजीरवाडी येथील २ हजार चौ. फूट ची ५ अनाधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. तर सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर २५६ वरील दीड हजार चौ. फूटाची अनाधिकृत बांधकामावरही कारवाई केली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंहम्हणाल्या की, पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकतधारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अन्यथा विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र केली जाणार असल्याचा इशारा मोनिका सिंह यांनी दिला आहे
पीएमआरडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी, पोलीस उपायुक्त तथा नियंत्रक निलेश अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, कनिष्ठ अभियंता सुदर्शन जाधवर, पीएमआरडीएचे अधिकारी आणि कर्मचारी आदीनी ही कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान लोणी काळभोर पोलिसांचामोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.