पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
November 20, 20210
Related Articles
June 20, 20220
कवठे येमाई येथुन आषाढी वारीसाठी दिंडीचे देहुकडे प्रस्थान कवठे येमाई (प्रतिनिधि धनंजय साळवे)
कवठे येमाई येथुन आषाढी वारीसाठी दिंडीचे देहुकडे प्रस्थान
कवठे येमाई (प्रत
Read More
July 23, 202119
महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरु – पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे, कपडे याविषयी आवाहन
मुंबई २३: महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रा
Read More
August 26, 20210
कोविड काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य – ॲड यशोमती ठाकूर
मुंबई -
कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक
Read More