पिंपरी : कौटुंबिक कलहातून पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सत्र न्यायाधीश जी पी अग्रवाल यांनी हा निकाल दिला मुलाचा खून केल्यानंतर आईनेही विष घेऊन गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला पिंपरी चिंचवड मधील तळवडे येथे पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. स्वाती विक्रम माळवदकर वय वर्ष 25 रा.बोरकर वाडी सुपा शिक्षा सुनावलेल्या निर्दयी महिलेचे नाव आहे स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर वय 30 यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.2ऑगस्ट 2016 मध्ये ही घटना घडली होती .याबाबतची माहिती अशी की फिर्यादी पत्नी भाऊ विक्रम वहिनी स्वाती पुतण्या निशिगंध आणि आई-वडिलांसह एकत्र राहत होते .स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहत होते .सर्वांनी एकत्र राहावे अशी विक्रमची इच्छा होती .त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद होत होता घटनेच्या दिवशी विक्रमने स्वातीला फोन केला असता तिने तो उचलला नाही .त्यामुळे विक्रमने फिर्यादी ना घरी जाण्यास सांगितले फिर्यादी घरी आले असता निशिगंध चटईवर चादर पांघरुन झोपलेला आणि स्वाती बेशुद्ध पडलेल्या दिसल्या फिर्यादीने दोघांना रुग्णालयात दाखल केले .डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले स्वाती ला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिली त्यांना एडवोकेट मनोज बिडकर यांनी मदत केली.
पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा
November 20, 20210

Related Articles
January 12, 20240
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवातून घडतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू……. सुनेत्रा पवार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन
पुणे, ता. 12 - खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांचे करियर घडविण्या
Read More
June 4, 20240
“हडपसर भागातील एका हाॅटेलमध्ये तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने उचलले पाऊल…
पुणे : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आल
Read More
July 24, 20214
भारतातील पहिले इटर्निया अॅल्युमिनीयम विंडो सिस्टीम शोरूम पुणे येथे सुरू – प्रथमच लॅब टेस्टेड विंडो सिस्टिम बाजारात
पुणे : अॅल्युमिनीयम विंडोजसाठी प्रसिद्ध असलेल्या “इटर्निया – अॅल्युमिनीय
Read More