Renaissance State – The Unwritten Story Making Of Maharashtra हे गिरीश कुबेर लिखित इंग्रजी पुस्तक असून या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज,सोयराबाई राणीसरकार व शाहू महाराज यांच्या बद्दल आक्षेपरह्य लिखाण केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांना काळ फासलेल आहे. राजेश गुंड हे संभाजी ब्रिगेडचे मावळ लोकसभा अध्यक्ष असून सतीश काळे हे देखील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने त्यांनी केलेल्या कृत्याचं समर्थन केलेलं असून जबाबदारी स्वीकारलेली आहे असे प्रतिपादन शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी केले.
राजेश गुंड व सतीश काळे यांची आत्ताच सुटका झालेली असून पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे की शिव शंभू प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन गिरीश कुबेर लिखित पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी किंवा आक्षेपार्ह लिखाण वगळावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येईल या कार्यक्रमा प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, पुणे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, पुणे जिल्हा विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयदिप रणदिवे, संभाजी ब्रिगेड नगरचे डॉ.संदीप कडलक व प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे पदाधिकारी नाशिक मध्ये स्वागत करण्याकरिता उपस्थित होते. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे ,शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, जिल्हासचिव नितीन रोठे पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे ,विक्रम गायधनी,विशाल आहिरराव,हर्षल पवार,नितीन डांगे,संतोष काळे व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.