प्रतिनिधि : स्वप्नील कदम
लोणी काळभोर : दुग्धव्यवसायीकाला 2 लाखाची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंजीरवाडी ( ता.11) संध्याकाळी ही घटना घडली आहे.
घनश्याम उर्फ गणेश आत्माराम शिंदे ( रा. कुंजीरवाडी ता. हवेली) व राजू उर्फ राजेंद्र गायकवाड (रा . शिंदवणे ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी आण्णासाहेब तानाजी खलसे ( वय 38 रा कुंजीर वाडी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.4) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब खलसे यांनी राजू उर्फ राजेंद्र गायकवाड यांनी त्यांच्या मोबाईल वरून फोन करून विष्णू जाधव चा नंबरकारी असल्याचे सांगून 10 ते 15 हजाराची खंडणी मागितली.त्या वेळीं त्यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. परंतु तो वारंवार फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत होता. त्यामुळे घाबरून कोणालाही या बाबत सांगितले नाही.
दरम्यान शनीवारी,( ता.11) दुपारी 3 सुमारास कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका चहाच्या टपरीवर घन शाम उर्फ गणेश आत्माराम शिंदे याने भाऊ सुदर्शन उर्फ तानाजी खलसे तसेच चुलतभाऊ सुनील भगवान खलसे यांना तो विष्णूपंत जाधव याचे काम पहात असल्याचे सांगून 2 लाख रूपये द्या पैसे न दिल्यास वाईट परिणाम होतील असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामूळे या दोघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी करत आहेत.