प्रतिनीधी: स्वप्नील कदम
टेम्पोतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांसह गुटख्याची खरेदी करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केले. त्यांच्याकडून तब्बल ४३५ किलो विमल गुटखा जप्त केला. बाजारपेठेत गुटख्याची किंमत साडेसात लाख रूपये असून टेम्पोसह १२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. शाहरुख इस्लाम शेख (वय २३) आणि गुटखा खरेदी करणारा सुरेश मिलापचंद ओसवाल (वय ४४ दोघे रा. लोणीकाळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सासवडमार्गे पुण्याच्या दिशेने टेम्पोतून अवैध गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती युनीट सहाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी वडकी गावच्या हद्दीत सापळा रचून टेम्पोचालक शाहरूखला ताब्यात घेतले. टेम्पोतून साडेसात लाखांचा ४३५ किलो विमलगुटखा जप्त केला. गुटख्याची खरेदी करणारा सुरेश ओसवाल यालाही अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुधीर टेंगले, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, ज्योती काळे यांनी केली.