पुणे

“महापालिका निवडणूक अन जनसंपर्काची उमेदवारांची लगीनघाई” – नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांची “चाय पे चर्चा”

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षीय उमेदवारांची लगबग सुरू आहे, लोकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्चून कार्यक्रम राबविले जात असताना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी संभाव्य प्रभागात कामाचा तडाखा लावला आहे, प्रभागात चाय पे चर्चा करून नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले जात असल्याने हडपसर मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
जुना व नव्याने समाविष्ट गावांचा मिळून प्रभाग क्र. 44 ची निर्मिती झाली आहे, जुन्या काळेपडळ चा प्रभाग क्रमांक 44 झाला आहे, दोन्ही प्रभागाचे नेतृत्व केल्याने व येथील नागरी प्रश्न सोडविल्याने भानगिरे दाम्पत्य दोन्ही प्रभागात निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत, दोन्ही प्रभागात नगरसेवक नाना भानगिरे यांनी जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत चाय पे चर्चा केली, दिलखुलासपणे गप्पा गोष्टी करत त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली आणि चहाचा आनंद लुटला. प्रसंगी जेष्ठ नागरिकांनीही अगदी हक्काचा मित्राप्रमाणे नानांना मार्गदर्शन करीत नाना तुझ्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमप्रमाणे उभे आहोत, असे भावनिक आश्वासन देत, पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संतोष रजपूत, म्हेत्रे काका, बशीर भाई, आण्णा रघुवंशी, आण्णा खोले, आण्णा वाडकर, पुणेकर काका प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रभागातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ….
काळेबोराटे नगर या प्रभागात नगरसेवक म्हणून पाच वर्षे काम केले आहे तसेच ते माझं सासर आहे, त्यातच नव्या समाविष्ट गावात नातेगोते व कार्यकर्त्याचे जाळे असल्याने येथील प्रश्न समजून सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, प्रभाग कुटुंब समजून आम्ही मूलभूत प्रश्न सोडवून येथे प्रकल्प राबविले, प्रभाग रचना बदलली म्हणून राजकीय स्वार्थ बाजूला ठेऊन मतदार नागरिकांशी नाळ तुटू देत नाही, म्हणून जेष्ठ नागरिक पाठीवर हात ठेऊन लढण्यासाठी प्रेरणा देत असतात.
प्रमोद नाना भानगिरे
नगरसेवक पुणे महापालिका