हवेली

कचऱ्यातून खत, बायोगॅस आणि वीजनिर्मितीही शक्य, निर्मला कांदळगावकर; एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या तर्फे महिला दिनानिमित्त सुप्रिया बडवे, डॉ. मेधा ताडपत्रीकर, अनिता काणे, अदिती भोसले वाळुंज आणि डॉ. अपूर्वा जोशी यांना विविध पुरस्कार प्रदान

हवेली प्रतिनिधी – अमन शेख

कचऱ्यातून खतनिर्मिती होते, बायोगॅसही तयार होतो कचऱ्यापासून वीजनिर्मिती ही करता येते. इतकंच नव्हे तर याच कचऱ्यातून अनेक स्त्रियांसाठी रोजगार उपलब्ध करता येत असून कचरा वेचण्यातून ‘स्वच्छ भारत’ उद्दिष्टही साध्य होत आहे. कचऱ्यालाच आपलं भांडवल बनवून यशस्वी आयुष्य जगता येईल, अशी भावना विवाम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेडच्या अध्यक्ष निर्मला कांदळगावकर यांनी व्यक्त केली.

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेकनॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आणि पुण्याच्या आयईईई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी बाल रोग विशेषज्ञ और सामाजिक कार्यकर्ता डॉ. सविता नाईकनवरे, कायनेटिक कम्युनिकेशन्स लि.चे संचालक डॉ दीपक शिकारपूर आणि मिटकॉमच्या संचालिका प्रा. डॉ. सुनीता कराड, डॉ. रजनीश कौर सचदेव बेदी, डॉ. रेखा सुगंधी, डॉ. रेणू व्यास, आसावरी भावे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होत्या.

दरम्यान बडवे ग्रुपच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे यांना एक्ससेप्सनल इंटर्प्रिनर अवॉर्ड, मंत्रा रिसर्च अँड कॉन्सुलटन्ट च्या संचालिका डॉ. मेधा ताडपत्रीकर यांना एक्ससेप्सनल सोशल इंटर्प्रिनर अवॉर्ड, टीसीएसच्या अनिता काणे यांना एक्ससेप्सनल लीडर अवॉर्ड, रिपोस एनर्जी च्या सहाय्यक संस्थापक अदिती भोसले वाळुंज यांना एक्ससेप्सनल स्टार्ट-अप आणि इंनोवेशन अवॉर्ड आणि हेड टेकनॉलॉजी आणि ड्यू डिलिजन्सच्या डॉ. अपूर्वा जोशी यांना रिस्क प्रो मेनेजमेंट राजिंग स्टार अवॉर्ड देऊन पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

निर्मला कंदळगांवकर म्हणाल्या कि गावात तो उकिरडय़ावर फेकला जातो तर शहरात पालिकेच्या गाडीतून नेऊन डम्पिंग ग्राऊंडवर ओतला जातो. एकेका शहरातून शेकडो टन कचरा निर्माण होतो आणि तो साचत जाऊन डिम्पग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर तयार होत राहातात, हि संपत्ती आहे. याकडे लक्ष्य दिल्यास नक्कीच लाभ होईल. कचऱ्यातून खतनिर्मिती होते, बायोगॅसही तयार होतो आणि कचऱ्यापासून वीजनिर्मितीही केली जाते. ५० व्या वर्षी मी कचरा संकलन आणि त्यावरील प्रक्रिया करत सोडविता येतात.
दरम्यान, डॉ. सुनीता कराड, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. सविता नाईकनवरे यांनी हि आपले विचार व्यक्त केले.