पुणे

डॉक्टर ला मागितली ३० लाखाची खंडणी, रेकॉर्ड वरील गुन्हेगार मंगेश कांचन याला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,

प्रतिनीधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि.१२/४/२०२२ रोजी तक्रारदार यांनी त्यांचा कडे आरोपी नामे मंगेश माणिक कांचन रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन,हवेली,पुणे हा तक्रारदार व त्यांचे डॉ. मित्र असे मिळून गर्भलिंगनिदान व गर्भपात असे खोटे साक्षीदार उभे करुन व त्या बाबत माझ्या कडे व्हिडिओ क्लिप असून ती मी पोलिसा कडे देऊन तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देऊन त्याचाकडचे ३० लाख रुपयांची खंडणी मागणी केली अशी तक्रार समक्ष भेटून सांगितले.तसेच तक्रारदार यांना उरुळी कांचन येथे प्रत्यक्ष आरोपी व त्यांचा एक अनोळखी साथीदार असे भेटून तक्रारदार यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कडे ३० लाख रुपयांची खंडणी ची मागणी केली असून दि.१२/४/२०२२ रोजी सदरची रक्कम घेऊन बोलविले आहे. वगेरे मजकुरची तक्रार दिली.
तक्रारदार यांनी दिलेले तक्रारीप्रमाणे दि.१२/४/२०२२ रोजी तक्रारदार यास आरोपीने फोनवरून संपर्क करून सदरची खंडणी रक्कम त्यांचे राहते घरी घेऊन येण्याबाबत कळविल्याने श्रीमती नम्रता पाटील पोलीस- उपायुक्त परिमंडळ-०५, पुणे शहर श्री बजरंग देसाई, सह पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणे कडून पोलीस सापळा पथक तयार करून सावळ्या चे नियोजन करून तक्रारदार हे आरोपी यांचे राहत्या घरी जाऊन सदरची खंडणीची रक्कम आरोपी यास दिली. असता नमूद आरोपी यास रंगेहात पकडण्यात येऊन त्याच्याकडून खंडणीची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. नमूद आरोपी मंगेश माणिक कांचन वय -35 वर्ष, रा. पांढर स्थळ, उरुळीकांचन, हवेली, पुणे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी यवत , पौड, लोणीकंद ओतूर विमानतळ हिंजवडी पोलीस ठाणे येथे खून, खंडणी, दरोड्याचा प्रयत्न, जबरीचोरी ,अपहरण, बलात्कार, भारतीय हत्यार कायदा इत्यादी प्रमाणे १२ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर ,मा. डॉ. रवींद्र शिसवे, सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग नम्रता पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ मा .श्री. बजरंग देसाई , सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र मोकाशी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुभाष काळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे), लोणी काळभोर पोलिस ठाणे, तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याकडील पोउपनि अमित गोरे, पोउपनि किरण धायगुडे यांच्यासोबत पो. हवा. नितीन गायकवाड, सुनील शिंदे,नरेंद्र सोनवणे, पो. ना श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत,पो. शी गणेश भापकर ,राजेश दराडे, दिगंबर साळुंखे, यांच्या पथकाने केली आहे. नमुद गुन्ह्यातील आरोपी यास अटक करून आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा.न्यायालयाने पाच दिवस पोलिस कस्टडीची रिमांड दिलेले असून पुढील तपास किरण धायगुडे पोलीस उप -निरीक्षक लोणी काळभोर पोलिस ठाणे करीत आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर मा अमिताभ गुप्ता व सह आयुक्त पुणे शहर रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार बेकायदेशीर धंदे करणारे तसेच शरीर व माला विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून यांचे समूळ उच्चाटन करणे याबाबत शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.