गांजाची तस्करी करणा-या दोघांना केले जेरबंद
साडे चार लाखांचा एकूण २२ किलो गांजा केला जप्त
हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर कडील पोलीस पथकास माहिती मिळाली की दोन इसम हे त्यांच्याकडील महिंद्रा स्कार्पिओ गाडीमधून गांजा विकण्याकरिता पूण येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांनी स्वतः पोलीस पथकासह बारावा मैल, लोणीकंद, पुणे येथे सापळा रचुन इसम नाम १) हनुमंत भाऊसाहेब कदम, रा. मु.पो. कुसडगाव, ता. जामखेड जि. अहमदनगर, २) तुषार संजय झाबरे, रा. मु. हिंगणी, पो. -टाकळसिंग, ता. आष्टी, जि. बीड यांना त्यांच्याकडील महिंद्रा स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेवून पचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गाडी मध्ये पांढ-या पोत्या मध्ये ठेवलेला एकुण ४,५०,०००/- रूपये
किंचा २२ किलो गांजा मिळून आला व गांजा विक्री करण्याकरिता महिंद्रा स्कार्पिओ गाडी वापरल्याने
४,००,०००/- रु किंमतीची गाडी असा एकूण ८,५०,०००/- रुकिचा मुद्देमाल जप्त करून लोणीकद पोलीस
स्टेशन येथे गु.र.क्र. २४८/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला असून नमुद गुन्हया मध्ये इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट- हे करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळ, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र •पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.