प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत माहे डिसेंबर २०१९ ते माहे मे २०२२ पर्यंत वेळोवेळी उरुळी कांचन, वळती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथे फिर्यादी नामे किरण किशोर पवार , वय २१ वर्ष. रा.दत्तवाडी, बगाडे मळा, उरुळी कांचन ता. हवेली, जि. पुणे – हिस आरोपी नामे वैभव म्हस्कु कुंजीर वय २४ वर्ष, रा वळती ता. हवेली जि. पुणे याने लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल गोल्डन व हॉटेल लेमन वुड तेथे शारिरीक लगट करून तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. म्हणुन भादवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मा. राजेन्द्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील सपोनी/ महानोर व पोलीस अंमलदार यांना कोम्बिंग ऑपरेशन चे अनुषंगाने कारवाई करण्याबाबत आदेश केले असल्यामुळे सदर फरारी आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार संभाजी दिवेकर व शैलेश कुदळे यांना त्याच्या बातमी दारा कडून खात्रीशीर बातमी मिळाली की बलात्काराच्या गुन्ह्यातील एक महिन्यांपासून फरारी असलेला आरोपी नामे वैभव म्हस्कु कुंजीर हा बाजारमळा उरळीकांचन येथे अंधारात बसलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत सपोनी/ महानोर यांना कळवले त्यांनी लगोलग मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करणेकामी आदेशीत केल्याने पोलीस अंमलदार संभाजी दिवेकर, शैलेश कुदळे, अमित साळुंखे, व इतर स्टाफ असे सदर ठिकाणी जाऊन मिळाले बातमी प्रमाणे सापळा लावून खात्री केली असता तेथे बातमी प्रमाणे एक इसम हा अंधारात बसलेला दिसून आला. तेव्हा आमची खात्री झाल्याने आम्ही सदर इसमास पकडण्यासाठी गेलो असता त्यास आमची चाहूल लागल्याने तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले असता आम्ही त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर पकडले. पकडलेल्या इसमास त्याचे नांव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव वैभव म्हस्कु कुंजीर वय -२४ वर्ष, रा. वळती ता. हवेली, जि. पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गायकवाड करीत आहे.