प्रतिनिधी -स्वप्नील कदम
कदमवाकवस्ती : लोणी काळभोर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र मोकाशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्यप्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या, कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला,समाजमन जागृत केले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले तसेच
भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जातीय सलोखा व एकात्मता जास्त आहे याचे कारण महाराष्ट्राला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे महामानव लाभले असे प्रतिपादन राजेंद्र मोकाशी यांनी यावेळी कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांस देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांस हवेली पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, ग्रामपंचायत सदस्या ज्योती काळभोर,सविता लांडगे, माजी उपसरपंच योगेश काळभोर,राजेंद्र काळभोर, नागेश काळभोर,गणेश कांबळे,वनसमिती अध्यक्ष युवराज काळभोर, भोलेनाथ शेलार,अमित काळभोर, कमलेश काळभोर, विशाल गुजर,संजय भालेराव व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचातीच्या सफाई कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी मर्दानी खेळ, रांगोळी स्पर्धा व हलगी वादनाचे आयोजन करण्यात आले. इतर उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगते व्यक्त केली. दिंगबर जोगदंड व आकाश मात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.