पुणे

अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हडपसर (प्रतिनिधी)
अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज 15 ऑगस्ट निमित्ताने हडपसर वैदुवाडी येथे गणपती मंदिरामध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला- मुलींचा संघटनेच्या वतीने गुणगौरव प्रमाणपत्र, पेन, डायरी व झेंडा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, संघटनेचे कार्याध्यक्ष नारायण शिंदे (माजी सरपंच), पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, राजू पवार गरवारे कॉलेज, राजेश पवार युवा नेते, दुर्गाजी पवार, सुरेश शिंदे सहाय्यक फौजदार, धीरज पवार, बापू पवार, अण्णा शिंदे, मुक्तांना सवारी, कृष्णा लोखंडे, गोकुळ शिंदे आणि राकेश पवार इतर असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी दशरथ हटकर व नारायण शिंदे यांनी उपस्थित वैदू समाजाला मार्गदर्शन केले.