पुणेहवेली

शिंदवणे घाटात भाविकांचा टेम्पो उलटून २० हून अधिक जखमी उरुळी कांचन जेजुरी मार्गावर दुर्घटना, तिघांची प्रकृती गंभीर; जखमींवर उरुळी कांचन येथे उपचार सुरु.

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

उरुळी कांचन जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात जेजुरीहून देवदर्शन करून उरुळी कांचन (ता. हवेली) च्या दिशेने निघालेल्या पिकअपचा शिंदवणे (ता. हवेली) घाटात गुरुवारी (ता. ०६) सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर २० हून अधिक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. मच्छिंद्र माधवराव देवकाते (वय-६६) शामराव आसाराम देवकाते (वय ६८), भाऊसाहेब उमाजी साबळे ( वय ६५ रा. तिघेही धामणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. तर जखमींना उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल व सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरचे अपघातग्रस्त नागरिक हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत. या पिकअप मधून बुधवारी दिवसभर २४ नागरिक हे देवदर्शणासाठी आले होते. दिवसभर पंढरपूर, जेजुरी येथील देवांचे दर्शन घेऊन पिकअप घेऊन देवाची आळंदी या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील घाटात आले असता उतारावरील वळणावरती चालकाचे पिकअप वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये पिकअप हे रस्त्यावरच पलटी झाले. यामध्ये वरील तिघांना जबर मार लागला. दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी तात्काळ हालचाली करून जखमींना उरुळी कांचन येथील येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल व गणराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये असणारे एकूण २४ नागरिकांपैकी तिघांची प्रकृती हि गंभीर आहे.