पौडरोड
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य पदी डॉ. गंगाधर सातव यांची नियुक्ती झाली आहे. डॉ सातव हे पीडीइए शाळेचे विद्यार्थी ते प्राचार्य पदी निवड असा शिक्षण क्षेत्रातील त्याचा प्रवास आहे. त्यांनी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील प्राध्यापक म्हणून गेली ३० वर्षे कार्यरत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉस्ट वर्क अकाउंटिंग बोर्डाचे सभासद म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन, विशेष पेपर वाचन त्यांनी केलेले आहे. आतापर्यंत वाणिज्य विषयाची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आयकर विषयवार लिखाण झालेले पुस्तक लोकप्रिय झाल्याने डॉ सातव याना विशेष प्रसिध्दी मिळालेली आहे. मगर महाविद्यालयातून ट्रेनिंग व प्लेसमेंट अंतर्गत ऑन जॉब ट्रेनिंग व नोकरी अंतर्गत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी नोकरी व रोजगरमुख झालेली आहेत. पुणे विद्यापीठ अंतर्गत त्याचे मार्गदर्शानाखाली ५ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. गुणवंत शिक्षक म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार बेंगलोर, मुंबई व कोल्हापूर येथील संस्थेकडून मिलालेले आहेत. त्याचे एकूण कार्याचा व शैक्षणिक उपक्रमाचा वेध घेता संस्थेने त्यांना प्राचार्य पदी नियुक्ती दिली आहे.